आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोयी:सलगरा दि आरोग्य केंद्रात गैरसोयी

काक्रंबा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सलगरा दि आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दोन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व सोयी सुविधासह नियुक्ती असताना एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी मुख्यालयी राहत नाही. सर्व सामान्य नागरिकांना ऐन वेळी तुळजापूरला खाजगी दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. गेली अनेक वर्षापासून येथे ठाण मांडून बसलेल्या कामचुकार व दांडी बहादर अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवेचे बारा वाजले आहेत. या प्रकरणी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी नागनाथ ढेरे यांनी केली आहे.

त्यामुळं या भागातील वीस ते बावीस गावे तांडे वाडया वस्तीवरच्या गरीबांना याचा चांगला फायदा होईल अशी आशा होती. मात्र या ठिकाणी कार्यरत असणारे आरोग्य विभागाचे निष्क्रिय व कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना या ठिकाणी ऐन वेळी आरोग्य सेवाच मिळत नाही.

रात्री अपरात्रीच काय पण दिवसा देखील रूग्णांना गरम पाण्यासह सोयी सुविधा मिळत नसल्याने त्यांना भुर्दंड सहन करत तुळजापूरातील खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागतात.गेली अनेक वर्षापासून आरोग्य केंद्राचा कारभार चक्क एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्यावर चालत आहे .जि.प.च्या आरोग्य विभागाने बायोमेट्रिक थंब मशीन बसवली आहे माञ ही थंब मशीन गेली दोन वर्षापासून बंद अवस्थेत असून याचा गैरफायदा या ठिकाणी नियुक्त अधिकारी कर्मचारी घेत असल्याचा आरोप आहे.

दीड महिन्यापूर्वी मागणी केली
सलगरा दि आरोग्य केंद्राचा डोलारा सध्या १२ कर्मचारी अधिकाऱ्यांवर सुरू असुन यापैकी काक्रंबा १ बारूळ १ देवसिंगा १ वानेगाव १ सलगरा दि १ व दोन शिपायाच्या जागा रिक्त असुन लाखो रूपये खर्च उभारण्यात आलेल्या नवीन ईमारतीत विज जोडणी नसल्याने या ठिकाणी मुख्यालय कोण राहत नाही नसल्याचे कारण सांगत दिड महिन्या पूर्वीच विज जोडणीची मागणी केली आहे.-डाॅ.अविनाश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, सलगरा दि .

बातम्या आणखी आहेत...