आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:हायवेवरील दुभाजकावर लोखंडी जाळी, वाहने दिसत नसल्याने अपघातात वाढ; कळंब येथील समस्या, समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने प्रश्न

कळंब16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंब-येरमाळा या सिमेंट रस्त्यावर गावालगत उभारलेल्या दुभाजकावरील लोखंडी जाळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समोरील वाहन आल्याचे दिसत नसल्याने धडक होऊन अनेकांना जीव गमवावा लागला.

त्यामुळे या लोखंडी जाळ्या आणखी किती जणांचा जीव घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे. शेगाव ते पंढरपूर हा ५४८ सी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कळंब ते येरमाळा या ३० किलोमीटरच्या लांबीत मागील चार वर्षांपासून प्रगतिपथावर आहे. आजवर या रेंगाळलेल्या कामामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. आता पूर्णत्वास आलेल्या गुळगुळीत रस्त्यावर निर्माण झालेल्या जंपिंगमुळे वाहनधारकांचा वाहनांवरील ताबा सुटत आहे. मस्सा, मनुष्यबळ पाटी, परतापूर, हसेगाव (के), कळंब शहरातील प्रशासकीय इमारत परिसर, होळकर चौक भागात या लोखंडी जाळीमुळे समोरच्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत.

अंदाज येत नसल्याने घडतात अपघात
हसेगाव, परतापूर, मस्सा (खं), कळंब येथील ‘टी-पॉइंट’सह वळण रस्त्यावर दुभाजकाला चारेक फूट उंचीची लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. येथे हव्या त्या बाजूस वाहन ‘पास’ करताना जाळीच्या आडोशाने समोरच्या वाहनांचा अंदाज येत नाही. यामुळेच बरेचसे अपघात झाले आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

२ मे रोजीची घटना, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
२ मे रोजी दुपारच्या वेळी कळंब येथून उपचार घेतल्यावर दुचाकीवरुन दोन पुरुष, एक महिला व एक लहान बाळ हे चौघे हासेगाव (के) गावाकडे जात असताना गावाजवळ दुभाजकाला चार फूट उंचीच्या लोखंडी जाळीमुळे येणारे टँकर दिसले नाही. त्यामुळे जोरदार धडक झाली. यात त्या मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मात्र यामध्ये चिमुकल्याचा जीव वाचला.

हासेगाव जवळ व‌ळताना वाहन दिसत नाही
हासेगाव (के) गावाजवळ दुभाजकात चार फुटी लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. वाहनांवरुन गावात वळत असताना या जाळीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
-परमेश्वर गुळमिरे, हासेगाव, के.

बातम्या आणखी आहेत...