आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीचे आजार वाढले:ढगाळ वातावरणाने साथीच्या आजारात वाढ, दम्याच्या 50 रुग्णांवर उपचार सुरू

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ९ अंशापर्यंत तापमान घटले होते. परंतु ढगाळ वातावरणामुळे साथीचे आजार वाढले असून लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच दम्याच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. ५० पेक्षा अधिक दम्याच्या रुग्णांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. थंडीमुळे दम्यासह सांधेदुखीचे आजार बळावत आहेत. गुरुवारी (दि.१५) सर्वाधिक २० सांधेदुखी, ५० दमा व ५० अन्य साथीच्या रुग्णांचा समावेश आहे.

अनेक रुग्णांना डेंग्यू सदृश्य तापाची लक्षणे आहेत.हिवाळा आरोग्यासाठी चांगला असतो, मात्र यंदा वातावरणात सतत बदल होत आहे. यामुळे कधी ९ अंशावर पार घसरत आहे तर कधी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडी गायब होते. यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून लहान मुलांसह वयोवृद्धांना त्रास होत आहे.

वातावरणातील बदल, डासांचे प्रमाण वाढले, १९० रुग्ण दाखल
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पारा ९ अंशाखाली आला होता. मात्र, अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. यामुळे साथीचे आजार वाढले. डासांचे प्रमाण अधिक झाले आहे. यामुळे स्त्री, पुरुष वॉर्डासह बालरुग्ण विभागात जवळपास १९० रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक साथीच्या आजारांसह थंडी, खोकल्याचे रुग्ण आहेत. तसेच दमा व सांधेदुचे वयोवृद्ध रुग्णही आहेत.

दम्याचे रुग्ण वाढले
वातावरण बदलामुळे साथीच्या आजारासह सर्दी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. दम्याचे ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व औषधे उपलब्ध आहेत. मेडिकल कॉलेज सुरू होत असल्याने सर्व सेवा दिल्या जात आहेत.-डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक.

बातम्या आणखी आहेत...