आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किमान व कमाल तापमानाचा पारा अधिक होता. दोन दिवसांपासून वाऱ्याच्या वेगासह थंडीचे प्रमाण वाढल्याने किमान १७ अंशावरील तापमानाचा पारा १३ तर कमाल ३२ अंशावरील तापमान २७ अंशावर आले.
यामुळे किमान ४ तर कमाल ५ अंशांनी पारा घटला. यामुळे थंडावा निर्माण झाला असून सकाळी धुके पडत रब्बी पिकांवर रोग पडत आहेत. तापमान १३ ते १४ अंशावर तर कमाल तापमान २७ ते २९ अंशावर स्थिरावल्याने थंडी वाढली. जानेवारीच्या शेवटी किमान तापमान १७ तर कमाल ३२ अंशावर गेले होते.
हवेतील वेगाने थंडीत वाढ
वातावरणातील बदलामुळे थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे. याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या हवेतील वेग काही प्रमाणात वाढल्याने दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. आता थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. -ए. के. भड, तापमान निरीक्षक, उस्मानाबाद.
चार दिवसांनी पुन्हा होणार थंडी गायब
आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३२ अंशावर होता. मात्र, दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. यामुळे थंडावा वाढला असून किमान तापमान ४ व कमाल तापमान ५ अंशाने कमी झाले आहे. मात्र, आगामी चार दिवसांनंतर पुन्हा थंडी कमी होऊन तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.