आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार:आवक घटल्याने दरात वाढ; शेवगा पुन्हा 100 अन् टोमॅटो 60 रुपये किलोवर

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी कांदा सोडल्यास कोणत्याच भाजीपाल्याचे दर कमी झाले नाहीत. यामुळे नागरिकांना चढ्यादरानेच टोमॅटो, शेवगा, हिरवी मिरची खरेदी करावी लागली. खाद्य तेलासह भाज्यांचे दर वाढल्याने किचन बजट कोलमडले. मागील काही दिवस शेवगा ५ रुपये पावकिलो होता. दोन ते तीन आठवड्यानंतर किरकोळ बाजारात पुन्हा शेवगा ३० रुपये पाव झाला असून १०० रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच टोमॅटोचेही दर फेब्रुवारीपासून चढेच असल्याने भाज्यांची चव बिघडली आहे.

किरकोळ बाजारात टोमॅटो अन् शेवग्याचे दर सलग सहा महिने स्थिर राहण्याची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एक महिना टोमॅटो ४० रुपये किलो झाले तर दुसऱ्या महिन्यात आवक वाढून १० रुपये किलोवर आले होते. मात्र, यंदा जानेवारी, फेब्रुवारीपासून टोमॅटोचे दर ४० ते ८० रुपये किलोवर स्थिरावले आहेत. सहा महिन्यापूर्वी किरकोळ बाजारात ५ ते १० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत होती. किरकोळ बाजारात मेथीची पेंडी २०, पालक ५ ते १०, कांदा पात १०-२०, कोथिंबीर १० रुपये पेंडी आहे. टोमॅटो ४० ते ६०, कांदे १० ते २० रुपये किलो आहेत. बहुतांश भाज्यांचे दर ६० ते १०० रुपये किलोपर्यंत आहेत. पाणकोबी ४०, फुलकोबी ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे.

नवीन हंगामातील माल येईपर्यंत भाज्यांचे दर चढेच
आगामी काही दिवसात खरिपाची पेरणी होणार असून भाजीपाला महाग असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही प्रमाणात भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतील. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक अत्यंत कमी आहे. यामुळे सध्या तरी नागरिकांना महागड्या भाज्या खाव्या लागणार आहेत. सध्या गवार ३० ते ४०, वांगी ४०, भेंडी ४० रुपये किलोने विक्री होत आहे.

खरिपाच्या मशागतीसाठी भाजीपाला मोडला
खरिपाची पेरणी करण्याकरिता मशागत करण्यासाठी शेतामधील काही गुंठ्यातील भाजीपालाही मोडला आहे. वरुनराजाचे आगमन झाल्यानंतर पेरणी करून भाजीपाल्याच लागवड करण्यात येणार आहे. मशागतीच्या कामामुळे शेतातील काही उपलब्ध भाज्यांची विक्री करण्यासाठी वेळ मिळत नाही. तसेच मजूर मिळत नसल्यामुळे उपलब्ध भाज्या काढून विक्री होत नाही.
-एम. व्ही. शिंदे, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...