आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केल्याने सेवावृत्ती वाढीस; तुरोरी येथील शेतकी प्रशिक्षण केंद्रामध्ये वृक्षारोपण

उमरगा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजसेवा करण्याची वृत्ती नागरिकांत कमी झाल्याची दिसून येत असल्याने माणुसकी लोप पावत आहे. शालेय जीवनात मुलांमध्ये सेवावृत्ती रुजवली तरच भविष्यात सेवाभाव रुजतो. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केल्याने सेवावृत्ती वाढीस लागते.वृक्षारोपांच्या वाढीबरोबर मुलांमध्ये सेवाभाव वाढीस लागेल, असे मत माजी पोलिस विशेष महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील तुरोरी येथे श्री ज्ञानेश्वर विद्यालय व न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, मधुकर धस शेतकी प्रशिक्षण केंद्र मंगळवारी (१४) वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानदीप शिक्षण संस्थाचे अध्यक्ष देविदासराव जाधव- माडीवाले अध्यक्षस्थानी होते. यावेळी शांतिदूत परिवाराच्या अध्यक्षा विद्याताई जाधव, समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ, माजी मुख्याध्यापक श्रीहरी जाधव, तुरोरी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अभिजित जाधव, पोलिस पाटील प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ आदी वृक्षांच्या रोपांची लागवड परिसरात करण्यात आली.

यावेळी शाळा परिसरात मुख्याध्यापक एन एम माने, उपमुख्याध्यापक बी एस जाधव, पर्यवेक्षिका सौ. अहिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. गेल्या वर्षीची लागवड करण्यात आलेल्या झाडांचे व्यवस्थित वाढल्यामुळे शांतिदूत परिवाराच्या वतीने कौतुक करण्यात आले. शाळा परिसरात वाढलेल्या वृक्षांची माहिती मुख्याद्यापकांनी मान्यवरांना ही देण्यात आली. यावेळी सौ. विद्याताई जाधव यांनी वृक्षांचे आयुर्वेदिकदृष्ट्या महत्व विद्यार्थी व उपस्थितांना सांगितले. भूमिपुत्र वाघ यांनी रोपे तयार करण्याचा व विविध संस्थांना रोपे देण्याबाबत आलेले अनुभव व्यक्त केले. सहशिक्षक जी. बी. दुधभाते यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक जी. व्ही. मुगळे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...