आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाववाढ:उन्हाचा कडाका वाढल्याने दुधाच्या दरामध्ये वाढ

तामलवाडी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तसेच जनावरांच्या खाद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे किरकोळ बाजारात दुधाचे भाव चांगलेच वधारले आहेत. ऐरवी पन्नास ते साठ रुपयाला एक लिटर मिळणारे दूध आता ७० ते ८० रुपयांना एक लिटर मिळू लागले आहे. उन्हाचा कडाका व पेंड, भुसा यासारख्या खाद्याचे भाव वाढल्यामुळे दुधाचे भाव वाढत आहेत. तर दुसरीकडे मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सहाजिकच दुधाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. उन्हामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दुधाचे दर शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

आणखी वाढ होणार
जनावरांच्या खुराकाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. व सध्या उन्हाळा असल्यामुळे दुधाची मागणी जास्त आहे. त्यामुळे येत्या काळात दूध दरात मोठी वाढ होऊ शकते. मनोज मोरे, दूध व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...