आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉझिटिव्ह:कोरोनाचा संसर्ग वाढताना ; उमरगा, दहा दिवसांत 8 कोरोना पॉझिटिव्ह

उमरगा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. तालुक्यात मागील दहा दिवसात ८ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसह कुटुंबाची खबरदारी घेणे गरजेचे आहे. मागील तीन महिन्यात एका ही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने कोरोनाची भीती कमी झाली होती. तालुक्यात एक एप्रिल ते आठ जूनपर्यंत आरटीपीसीआर अन् स्वॅब अहवालात रुग्ण आढळून नव्हता.

जून मध्ये मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात ९ तारखेला एक, १३ जूनला जकेकूर येथे एक, १४ जूनला मुरुम एक, १५ जून रोजी शहरात एक, ग्रामीण भागात एक असे पाच कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तीन जण बरे होवून विलगीकरणात आहेत. १७ जूनच्या ७६ स्वॅब अहवालातून तीन पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात शिवपुरी कॉलनी एक, ग्रामीण भागात चिंचोली जहागीर, माडज येथे प्रत्येकी एक असे तीन जण पॉझिटिव्ह आलेत. मागील दहा दिवसात आठ पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...