आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:येरमाळ्यात ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

येरमाळा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील येरमाळा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी विविध समस्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.घाणीचे साम्राज्य, सुरळीत पाणीपुरवठा आदी कारणांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.

येरमाळा गाव हे कळंब तालुक्यातील प्रमुख एक गाव आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडे सर्वच १३ जागा आल्या. मात्र नागरिकांच्या समस्या काही संपलेल्या दिसत नाहीत.अनेक वॉर्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, अंगणवाडी, वसाहती व अन्य परिसरामध्ये अतिशय दुर्गंधीचे साम्राज्य आहे. गावात पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा सुरळीत नसतो. गावातील नागरिकांना ग्रामविकास अधिकारी वेळेवर हजर नसतात. त्यामुळे कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील कामे गावात चालू नाहीत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. तसेच गावातील गटारी तुंबलेल्या आहेत.या समस्यांच्या पार्श्वभूमीवर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील काही युवकांनी बुधवारपासून (दि.१६) उपोषण सुरू केले आहे. उपोषणात सुहास बारकूल,लहू बारकुल, संजय बारकुल, सिद्धेश्वर बारकुल, शरद बारकुल आदींनी सहभाग घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...