आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:व्यंकटेश महाजन महाविद्यालयात  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य शेषाद्री डांगे, कमलाकर पाटील यांची उपस्थिती होती.

यादिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विविध विभागांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना शेषाद्री डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय जोशी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...