आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाविन्यपूर्ण उपक्रम:शेतकऱ्यांसाठी ‘स्वतंत्र सुरक्षा’ योजना ; कंपन्यांचा नफेखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न

तुळजापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी विमा कंपनी चालवण्याची 'स्वतंत्र सुरक्षा' ही नाविन्यपूर्ण योजना आहे. या माध्यमातून किचकट अटी शर्तीच्या आडून विमा कंपन्यांचा नफेखोरीला आळा घालण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया चे संचालक सिध्देश सुब्रमण्यम यांनी केले आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत महाएफपीसीच्या आठवा वर्धापन दिनानिमित्त शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी शाश्वत उद्योग या विषयावरील चर्चासत्रात सिध्देश सुब्रमण्यम बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट प्रकल्पचे नोडल अधिकारी अभिमन्यू काशिद, गुणनियंत्रण अधिकारी सी. जी. जाधव व कार्यक्रम समन्वयक डॉ. गुणवंत बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती 'स्वतंत्र सुरक्षा' ही संकल्पना मराठवाड्यातील उस्मानाबाद या जिल्ह्यात सुरुवातीला पायलट या तत्त्वावर चालवली जाणार आहे. नोडल अधिकारी अभिमन्यु काशिद यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी माहिती दिली कार्यक्रमाला उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुण ३५ पेक्षा अधिक एफपीओ कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकीता सोनवणे यांनी तर आभार समन्वयक डॉ. बिराजदार यांनी मानले.● विमा दाव्याची किचकट प्रक्रिया थांबावी असा उद्देश यामागे आहे.

बातम्या आणखी आहेत...