आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशन:ऑनलाइनद्वारे विदेशात जाणारा पैसा रोखण्यासाठी भारत ई-पोर्टल सुरू

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी ऑनलाइन कंपन्या व व्यापारी आहेत. त्यामुळे भारतातील पैसा विदेशात मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे भारतातील व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसत असून ते दुर्दैवी आहे. ते रोखण्यासाठी भारत ई-पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या माध्यमातून तळागाळापर्यंत सक्षम करण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रदेशाध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिले.

उस्मानाबाद येथील पुष्पक मंगल कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष संतोष सोहनी, जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, मराठवाडा जिल्हा सचिव विनोद पिंगळे, लक्ष्मीकांत जाधव, एचडीएफसी बँकेचे विभागीय व्यवस्थापक अशोक शिंदे, संजय मोदाणी, किशोर गोरे आदीसह नूतन पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना निवंगुणे म्हणाले की, प्रत्येकाने मोबाईलचा वापर केवळ संघटना वाढविण्यासाठीच नव्हे तर व्यापार वाढविण्यासाठी देखील करणे आताची गरज आहे. ऑनलाईनच्या संकटावर जपान व चीन या दोनच राष्ट्रांनी केवळ भाषेच्या जोरावरच सक्षमपणे मात केली आहे. कारण या देशाची भाषा एकच आहे मात्र भारतात अनेक भाषा असल्यामुळे यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी भारत ई-पोर्टलची निर्मिती केली असून देशातील जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यावर आपली नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी लक्ष्मण जाधव यांनी जिल्ह्यात खवा, गुळ क्लस्टर होत असून शेती सोलर सारखे उद्योग उभा राहत असून जिल्ह्यासाठी व्यापारी महासंघाचे कार्यालय व्हावे अशी मागणी केली. प्रास्ताविक नूतन प्रदेश उपाध्यक्ष संजय मंत्री ,सूत्रसंचालन अभिलाष लोमटे व आभार धनंजय जेवळीकर यांनी मानले.

सोशल मीडियात माहिती देण्याचे आवाहन
विशेष म्हणजे आताची मुख्य बाजारपेठ ही मोबाईल असल्यामुळे परिस्थितीनुसार बदल करावा व ते अवगत करणे प्रत्येकाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन वर वस्तू मागविण्यामध्ये आयटी पार्क अग्रेसर असून तुम्ही देखील तुमच्या व्यवसायाची माहिती सोशल मीडियावर दररोज टाकलीच पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...