आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भारत जोडो त मांडले वकिलांचे प्रश्न

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो पदयात्रेदरम्यान उस्मानाबादमधून सहभागी झालेले ॲड. विश्वजित शिंदे यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांची नांदेड येथे भेट घेऊन वकिलांच्या अडचणी व प्रश्न मांडले. तसेच केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यावर वकील संरक्षण कायदा पारित करण्याची मागणी केली. यावर प्रश्न मांडणारे काँग्रेस नेते अॅड. विश्वजित शिंदे यांना दिल्लीला सविस्तर चर्चेसाठी भेटण्यास सांगितले.

विधी, मानवी हक्क व आरटीआर विभाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शिंदे यांनी वकिलांसाठी जीवन संरक्षण विमा वकील नोंदणी करतेवेळी देण्यात यावा, वकिलांना राष्ट्रीयकृत बँकेकडून विनातारण कर्ज देण्यात यावे, ज्युनिअर विधिज्ञ व महिला विधिज्ञांना दरमहा आर्थिक साहाय्य द्यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे अनेक वेळा मागणी केल्याचे सांगितले. वकील सरक्षण बिलाचा मसुदा तयार केला असल्याचेही सांगितले. यावेळी प्रदेश व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...