आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष हवे:निकृष्ट कामामुळे लातूर-गुलबर्गा महामार्ग बनतोय अपघातप्रवण क्षेत्र; अपघात झाला की, तेवढयापुरते सुरक्षेचे तकलादू उपाय, नंतर ये रे माझ्या मागल्या

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकेकूर-चौरस्ता ते औसा या गुलबर्गा- लातूर महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे वर्षातच सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाली असून याच्या दुरुस्तीकडे कोणाचे लक्ष नाही शिवाय लक्ष्मीपाटी, श्री बिरुदेव मंदिर, बाबळसूर माडज पाटी, नारंगवाडी व कवठा आदी ठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने सहा महिन्यात झालेल्या ३० अपघात तीन मृत्यू तर ४७ जण जखमी झाले आहेत.

लातूर-गुलबर्गा महामार्गावर औद्योगिक परिसरात रस्त्यावर उभे राहणारी बेशिस्त वाहने, खचलेल्या साइड पट्टया आणि उडणाऱ्या धुळीमुळे शिवाय कामाचा दर्जा निकृष्ट पध्दतीने झाल्याचे दिसून येत आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रस्ता करून देण्याची मागणी करूनही रस्ता केला नसल्याने लक्ष्मीपाटी, बिरुदेवमंदिर, बाबळसुर, माडजपाटी, गुलबर्गा मार्गावर गुंजोटीपाटी, कदेरपाटी व कसगी परिसरात सतत वाहनांचे अपघात होत असताना संबंधित रस्ते सुरक्षा समिती, आरटीओ, पोलिस प्रशासन, सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी जबाबदार यंत्रणा मात्र सुस्त पडली आहे.

हाताला आलेली मुले, कुणाचे आईवडील,भाऊ,बहीण असे अपघात होवून मृत्यू व अपंग होत आहेत. पोलीस प्रशासन सोपस्कार उरकत पुन्हा कामाला लागते, मरणारे मरत आहेत कुणाला काहीच होत नाही. शिवाय जनतेलाहि काही वाटत नाही. सातत्याने अपघातांच्या घटना घडून अनेकांचे प्राण जात आहेत,मात्र कुणी जाब विचारत नाहीत अपघात झाला की दोन दिवस पोलिस, दिशादर्शक फलक आदी सुरू होते. सर्व काही विसरले जाते वेळ गेली की, पुन्हा ये रे माझ्या मागल्या हिच अवस्था कधी थांबणार याचे चिंतन करण्याची वेळ आली आहे.

सहा महिन्यांत ३० अपघात, तिघांचे गेले प्राण
लातूर-गुलबर्गा महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या वाहनात व दुचाकी सर्वाधिक आहेत. रस्त्यालगत बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार रोजचा झाला आहे. गेल्या सहा महिन्यात या मार्गावर विविध ठिकाणी ३० अपघात झाले असून यामध्ये तिघांचा मृत्यू तर ४७ जण जखमी झाले आहेत. जकेकुर-चौरस्ता येथे अहोरात्र अपघातग्रस्ताच्या सेवेत कार्यरत असलेल्या जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने सहा महिन्यांत २७ अपघातातील ४७ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने प्राण वाचविले आहेत. लातुर-गुलबर्गा रोडवर बाबळसुर पाटी येथे ट्रक व दुचाकी अपघात सोमवारी (०९) सकाळी साडेआठ वाजता झाला. त्यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. नाईचाकूरकडून येणारी दुचाकी (क्रमांक एमएच २५ जे १३३) गुलबर्गाहून लातूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक केए ३२सी ५४०४) यात जोराची धडक होऊन दुचाकीचालक शाहरुख लालू पठाण (२२) रा. नाईचाकुर हा गंभीर जखमी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...