आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:सोयाबीनवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव; आमदारांकडून पीक पाहणी

कळंब14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन पिकावर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक पिवळे पडत असून यातून खर्चही निघणार नाही, त्यामुळे आम्ही काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात विचारला. कळंब तालुक्यात ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. सोयाबीनवर पेरणीपासूनच गोगलगाय, यलो मोझॅकचा हल्ला झाला. शेतकऱ्यांनी फवारणी करून पीक जगवले.

आता तांबेरा बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिवळे पडले. आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी मस्सा (खं) परिसरात पिकांची पाहणी केली. कसेबसे सोयाबीन आले होते आणि याला तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले आहे, तत्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.यावेळी आमदार कैलास पाटील यांनी तत्काळ सोयाबीनचे पंचनामे करण्याची सूचना कृषी विभागाच्या अधिकऱ्यांना दिली. यावेळी सरपंच प्रा. राजश्री धनंजय वरपे, उपसरपंच विश्वनाथ तांदळे, शेतकरी वैजू कचरे, लक्ष्मण थोरात, दत्ता सावंत, अक्षय माळी, विक्रम वरपे, नवनाथ शिंदे, रामभाऊ इंगोले, गोकुळ इंगोले, बब्रुवान गोरे, सचिन फरताडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...