आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिके हातची गेली. त्यामुळे रब्बीतील हरभरा पिकावर शेतकऱ्यांच्या आशा केंद्रीत झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी संकटातून सावरुन रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा व ज्वारी पिकांची पेरणी केली. तालुक्यात १७ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून भूम तालुक्यात ढगाळ वातावरण आहे.
पहाटे दाट धुके पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे रब्बी पिकही वाया जाणार काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशी स्थिती राहिली तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरही अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.