आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महागाईने जनता हैराण, युवासेनेचा इंधन दरवाढी विरोधात थाळीनाद

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणुकी अगोदर दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पाळण्याची मागणी

महागाईविरोधात युवासेनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातही आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी (दि. ३) उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा, भूम येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. महागाईमुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

महागाई विरोधात युवासेनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून युवासेना तुळजापूर तालुकाच्या वतीने शहरातील पेट्रोल पंपावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने सत्तेवर येण्याअगोदर जनतेला महागाई कमी करण्याची आश्वासने दिली होती. परंतु सद्यस्थितीत केंद्र सरकारला याचा विसर पडला आहे. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचा सार्वजनिक कार्यक्रम केला होता, त्याचप्रमाणे थाळी वाजवल्यानंतर पंतप्रधानांना महागाई पळवून लावण्याची सद्बुद्धी लाभावी, यासाठी आंदोलन करत आहोत. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुधीर भाऊ कदम, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखन परमेश्वर, शिवसेना उपशहरप्रमुख प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, दिनेश रसाळ, शहरप्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना विभाग प्रमुख बालाजी पांचाळ, सोशल मीडिया विभाग प्रमुख महादेव पवार, प्रेम कदम, प्रसाद रोचकरी, निरंजन इंगळे, कृष्णा झाडपीडे, संग्राम नाईकवाडी, गणेश नवगीरे, आदर्श भोसले, अंबादास सौदागर, सर्वेश चव्हाण, प्रसाद उंडरे, विकास साळुंके आदी शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंड्यात थाळीनाद
परंडा शहरात इंधनदरवाढ व महागाईच्या विरोधात युवासेना व शिवसेनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. दुचाकी खाली पाडून गॅस सिलिंडरला फुलांचा हार घालून केंद्र सरकारचे अभिनंदन व निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके, जिल्हा संघटक मेघराज पाटील, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, दत्ता महाराज रणभोर, दादा फराटे, बळीराम गवारे, समीर पठाण, भगवंत गोडगे, नवनाथ बुरंगे, बुध्दिवान लटके, महावीर बारसकर, बुवा गोडगे आदींसह युवासेना व शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...