आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहभोजन:क्षेत्रभेटींतर्गत विविध ठिकाणांना भेटी देत माहिती संकलन ; जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद प्रा. शाळेच्या वतीने सहशालेय उपक्रमांतर्गत क्षेत्र भेटीतून विविध ठिकाणांना भेट देऊन माहिती घेण्यात आली.उपक्रमांतर्गत शहरातील श्री दत्त मंदिर, ग्रामदैवत हेमाडपंथी प्राचीन श्री महादेव मंदिर, वाचन प्रेरणा उपक्रमांतर्गत हुतात्मा स्मारक येथील कै. डॉ. रमेश पाटील स्मृती वाचनालयास भेट देण्यात आली. श्री दत्त मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी श्रमदान व स्नेहभोजन केले. यानंतर शहरातील हुतात्मा स्मृती उद्यानात विद्यार्थ्यांनी खेळण्याचा आनंद लुटला. कै. डॉ. रमेश पाटील हुतात्मा स्मृती वाचनालयातील कामकाज, दैनिक वर्तमानपत्र, पुस्तकांची माहिती, देवघेवीबद्दल ग्रंथपाल अनिल व्हंताळकर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

ग्रामदैवत श्री महादेव मंदीर हे प्राचीन काळातील हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचे प्राचीन कालीन बांधकामासह मुख्य गाभाऱ्यात ब्रम्हा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांच्या मूर्ती आहेत. त्यामुळे महादेव मंदीर हजारो भक्तभाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. धार्मिक उत्सवानिमित्त वर्षभरात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम देवस्थान पंचकमिटीच्या वतीने घेण्यात येते, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. क्षेत्रभेटीतून प्राप्त माहिती विद्यार्थ्यांनी नोटबुक मध्ये संकलित केली आहे. उपक्रमास गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, रोटरीचे अध्यक्ष अजित गोबारे, नितीन होळे, मनीष सोनी, पतसंस्था अध्यक्ष इब्राहिम चौधरी आदींनी भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, उमरगा रोटरीच्या वतीने जिप शाळेला पाच हजार रुपयांचा लोकवाटा शालेय साहित्यासाठी देण्यात आला. मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांनी हेमाडपंती महादेव मंदिराची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सहशालेय क्षेत्रभेटीच्या यशस्वितेसाठी शिक्षक उमाचंद्र सूर्यवंशी, लक्ष्मीताई वाघमारे, अशोक बिराजदार, सखुबाई माने यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीला नेणे-आणण्यासाठी मुकुंद पाटील व गोविंद पाटील यांनी वाहन उपलब्ध करून दिल्याबद्दल व रोटरी क्लबचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...