आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:लोककलांच्या सादरीकरणातून गावोगावी योजनांची माहिती

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक प्रसार माध्यामांच्या जमान्यातही लोककलावंतानी लोककला जिवंत ठेवल्या आहेत. या लोककलांच्या सादरीकरणातून जिल्ह्यातील गावोवावी शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे.

जिल्ह्यात बुधवारपासून (दि.९) लोककलावंतांच्या तीन कलापथकांच्या संचाचे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक लक्षपूर्वक कार्यक्रम ऐकत असून योजनांची माहिती समजून घेत आहेत. पोवडा, गवळण, बतावणी, सवाल जबाब आणि गीतांच्या माध्यामातून लोककलांचा वापर करत कलापथकातील कलावंत योजनांची माहिती देत आहेत. गुरुवारी (दि.१०) कळंब तालुक्यातील मसा (ख), वाशी तालुक्यातील तेराखेडा आणि बावी तर तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) येथे कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. गुरुवारी रात्री या कलाफथकांनी कलापथकांनी कळंब, तुळजापूर व वाशी तालुक्यात सादरीकरणातून शासकीय योजनांबाबत नागरिकांमध्ये जागर केला.

बातम्या आणखी आहेत...