आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:एकुरगा येथे गरोदर व स्तनदा मातांना आहार आणि लसीकरणाबाबत माहिती; गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन

उमरगा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एकुरगा येथे स्पर्श ग्रामीण रुग्णलय सास्तूरअंतर्गत सोमवारी (२०) मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून गरोदर आणि स्तनदा माताची बैठक घेण्यात आली. एकुरगा गावातील गरोदर आणि स्तनदा मातांना आहार अन लसीकरणा संदर्भात माहिती, एम मित्रा योजनेंतर्गत माहिती व नवीन गरोदर माताची नोंदणी, गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी स्पर्श रुग्णालयाचे डॉ. युवराज हक्के,पल्लवी औटे, महेश पांचाळ, अंजुम इनामदार, पूनम राजपूत, हेमाताई सुरवसे, महादेवी करके उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ हक्के म्हणाले गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना जास्तीत जास्त खायला सांगितले जाते. गरोदर आहात म्हणून खूप खाल्ले पाहिजे असे नसून किंबहुना संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्याने तुमची आणि बाळाची जास्तीची पोषणाची गरज भागेल. आहाराचा तक्ता भाज्या व फळांचा समावेश केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. तुम्हाला लागणाऱ्या प्रमाणात फळे आणि भाज्या घेतल्या नाहीत तर बाळाच्या पोषणाच्या गरजा पूर्ण होणार नाहीत.

मुलांचे विकास तज्ञांच्यानुसार ज्या स्त्रिया गरोदरपणात जास्त फळे खातात त्या स्त्रियांच्या बाळांचा विकास १२ महिन्यांच्या वयात जास्त चांगला होतो. खनिज द्रव्ये आणि तंतुमय पदार्थ घटकांनी समृद्ध फळे खाल्ल्याने आई आणि बाळास पोषण मिळते, असे सांगितले. पल्लवी औटे यांनी लसीकरण आणि घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली. एम-मित्रा उपक्रमातून मोबाइलद्वारे समस्या आणि अडचणीबाबत माहिती दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...