आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:अॅसिड हल्ला, अत्याचारात कायदा संरक्षणाची माहिती

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब व समाजात एखाद्या मुलाला हिंसेला सामोरे जावे लागते. मुला-मुलीवर अत्याचार झाला असेल तर त्यांची कोणतीच चूक नसते. मुला-मुलींना सुरक्षित राहण्यास सांगण्यापेक्षा त्यांच्यासाठी सुरक्षित परिस्थिती कशी तयार करू शकतो, यावर विचार व्हावा. लैंगिक अत्याचार झाल्यास न घाबरता आपले शिक्षक व आई-वडिलांना कल्पना देवून त्याची न्यायालयात कशी दाद मागता येते, याबाबत दिवाणी न्यायाधीश एम. डी. चराटे यांनी माहिती दिली.

तालुका विधी सेवा समिती, विधिज्ञ मंडळ व कै. शरणप्पा मलंग विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) कायदेविषयक शिबिरात न्यायाधीश चराटे बोलत होत्या. दिवाणी न्यायाधीश एस. ए. कानशिडे, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. जी. के. गायकवाड, सचिव अॅड. पी. एन. पाटील, सहसचिव अॅड. वर्षा जाधव, अॅड. पी. एन. पनुरे, अॅड. व्ही. एस. आळंगे, अॅड. शिल्पा सुरवसे, ॲड. एम व्ही जाधव, अॅड. एस पी इनामदार, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम एस मलंग, सचिव सुरेखाताई मलंग आदींची उपस्थिती होती. कायदेविषयक शिबिराचे नियोजन अध्यक्ष डॉ. मलंग व मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी केले होते. यावेळी अॅड. शिल्पा सुरवसे यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम, २०१६ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. एस व्ही आळंगे यांनी राष्ट्रीय विधी सेवा समितीमार्फत अॅसिडने बाधित झालेल्या व्यक्तीला सवलत कायदा २०१६ नुसार देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा, मदत व पोस्को कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी न्यायाधीश एस ए कानशिडे यांनी अॅसिडने बाधित झालेल्या व्यक्तीसाठी कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत. एखाद्या लहान मुला-मुलिवर लैंगिक अत्याचार झाल्यास न घाबरता शाळेत व घरात कल्पना देवून संविधानिक मार्गाने न्यायालयात दाद मागता येते, असे सांगितले. ॲड. एस पी इनामदार यांनी प्रास्ताविक केले करुन सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, उमरगा न्यायालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...