आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह १ मार्च ते ८ मार्च २०२३ या कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे स्वागत व जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह या कार्यक्रमाची प्रास्ताविका कान- नाक- घसा तज्ञ डॉ. सचिन देशमुख यांनी केली. तसेच जागतिक कर्णबधिर दिन व सप्ताह निमित्त अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ यांनी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले .
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ शिल्पा दोमकुंडवार यांनी कानाची काळजी कशी घ्यायची व आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम व विभागामधे मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, त्याचा सर्व गरजू रुग्णांनी या सेवेचा फायदा घ्यावा ,या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये सर्व लोकांना याचा फायदा कशा प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे ,डॉ. ज्योती बरकडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.