आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-४ नुसार गाव पातळीवरील गाव नमुने १ ते २१ तलाठी दप्तर अद्ययावत करण्यासंदर्भात दिशानिर्देश आहेत. त्यानुसार वेळोवेळी शासन स्तरावरुन सदर नमुने अद्ययावत करण्याचे कामकाज पार पाडले जाते. गाव नमुना १ क चे सुधारीत १-क मधील १ ते १६ भाग करण्यात आले असून, त्यामध्ये प्रतिबंधीत सत्ता प्रकाराच्या मिळकतींच्या नोंदी वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतात. सदरील गाव नमुना नंबर १ क मध्ये अद्ययावत नोंदी घेण्यासंदर्भात शासनाकडून सतत पाठपुरावा सुरु असल्याने देवस्थान इनाम, वतन, वक्फ, सिलींग, कुळ जमिनी, भूसंपादीत आदी जमिनींचे अभिलेखे अद्ययावत करण्याची माेहीम राबविण्यात येत आहे. यामुळे खरेदी-विक्री करताना नागरिकांची फसवणूक टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटले आहे की, महसूल व वन विभाग यांचा शासन निर्णय १७.०३.२०१२ व शासन परिपत्रक ११.०१.२०२१ च्या पत्रान्वये सर्व महसूली अधिकारी यांनी गावांचे अधिकार अभिलेखातील धारणाधिकाराची जुन्या अभिलेखाच्या आधारे पडताळणी करुन संगणकीकृत गाव नमुना १ क व गाव नमुना ७ अद्ययावत करण्यासंदर्भात विशेष मोहिम राबविणेचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी ई-चावडी आज्ञावली विकसीत करण्यात येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून सर्व महसूली अभिलेखे अद्ययावत करण्याबाबतचे निर्देश जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात महसूली अभिलेखांचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरु असून जुन्या अभिलेखांची पडताळणी करत १-क व गाव नमुना ७ मधील नोंदी अद्ययावत करण्यात येत आहेत.
जमिनी हस्तांतरणासाठी सवलत वेगवेगळ्या कायद्यांतर्गत हस्तांतरणास प्रतिबंध या अटी व शर्तीवर वाटप करण्यात आलेल्या जमिनी, सत्ता प्रकारातील जमिनी विविध कायद्याअंतर्गत हस्तांतरण करण्यासाठी बाजार मूल्याच्या किंवा आकारणीच्या ठराविक रक्कम भरणा करुन नियमित करण्यासाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित सत्ता प्रकाराच्या जमिनी वर्ग-१ करण्याबाबतही नागरिकांसाठी सुधारणा करुन देण्यात येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.