आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी यांची सुचना:नवरात्राच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात  पाहणी व अतिक्रमण विरोधात मोहीम

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २) पालिकेच्या वतीने महाद्वार परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. यावेळी महाद्वार परिसरातील दुचाकी उचलण्यात येऊन अतिक्रमण हटविण्यात आले. २६ सप्टेबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शहरातील वाहनतळ व वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी नळदुर्ग रोडवर मस्के प्लाॅटींग येथे कर्नाटक एसटी साठी तर लातूर रोड नविन बसस्थानका समोर दुचाकी पार्किंग ची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. उस्मानाबाद रोड वाहनतळ, हाडको वाहनतळ, घाटशिळ रोड वाहनतळची पाहणी करण्यात आली तर भवानी कुंडाची सफाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

सर्व्हिस रोडचे काम १० दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नळदुर्ग रोड वरून बाह्यवळण रस्त्याला जोडणाऱ्या सर्विस रोड कामाची पाहणी केली व हे काम १० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. लातूर रोड वरील नव्या बसस्थानका समोरील व्यावसायिकांना नवरात्रात रस्ता मोकळा ठेवण्याचा सूचना देण्याचे निर्देश दिले. यंदा २६ सप्टेबर रोजी सोमवारी घटस्थापना आहे. यानिमित्त नऊही दिवस मोठया प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...