आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जिल्हा कृषी अधीक्षकांनी केली तपासणी; दुकानांवर कारवाई

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने खते व बियाणे विक्रीत शासनाचे निर्देश न पाळता हेराफेरी करणाऱ्या जिल्ह्यातील चार दुकानांवर कारवाई करून जिल्हा अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून परवाने निलंबित करण्यात आले आहेत खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा कृषी विभाग सतर्क झाला आहे.

जिल्हा अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांच्यासह मुख्य पथक दुकानांची अचानक तपासणी करत फिरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५ दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ११ दुकानांमध्ये दोष आढळून आले आहेत. यापैकी चार दुकानांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील जनता बँकेजवळील आधार अॅग्रो एंटरप्रायजेस या दुकानावर एक महिना परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पॉस मशिन दुकानात आढळून आली नाही. तसेच स्टॉक रजिस्टर व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळली. उमरगा तालुक्यातील आलूर येथील श्री स्वामी समर्थ अॅग्रो कृषी सेवा केंद्रावर एक आठवडा परवाना निलंबनाची कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...