आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दीडशे दुकानांची तपासणी, ६० किलो प्लास्टिक जप्त ; पालिकेची मोहीम, दोन दुकानांना १० हजारांचा दंड

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असून पालिकेने १ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत १४२ दुकानांची तपासणी करून ६० किलोपेक्षा अधिक प्लास्टिक जप्त केले आहे. तपासणीनंतर सिंगल यूज प्लास्टिक आढळून आल्यास दोन दुकानदारांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. असे असले तरी हातगाडे व काही दुकानदार सिंगल प्लास्टिकचा वापर करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.

उस्मानाबाद शहरातील व्यावसायिकांनी सिंगल प्लास्टिकचा वापर टाळावा याबाबत पालिकेकडून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर सिंगल प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानात छापे टाकून तपासणी करत प्लास्टिक जप्त केले होते. तसेच पुन्हा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही अनेक व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. यामुळे व्यावसायिकांसह हातगाडे, फळ विक्रेत्यांनी सिंगल प्लास्टिकचा वापर करणे टाळला होता.

मात्र, अधुनमधुन पालिकेकडून कारवाईत खंड निर्माण झाल्यास पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू होतो. अशा काही व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये पायल स्विट होम व करंडे किराणा भांडारचा समावेश आहे. सध्या शहरातील भाजी मंडई, किराणा दुकान, मोठे प्लास्टिक विक्रेते, प्लास्टिक गोडाऊन यांची तपासणी करण्यात येत आहे. शासनाने १ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्लास्टिक बंदीबाबत मोहीम तीव्र केली आहे. तपासणीनंतर पुन्हा प्लास्टिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. यामुळे व्यापाऱ्यांकडून वापर कमी झाला आहे. मात्र, प्लास्टिक कॅरिबॅगला पर्यायी कमी दरातील पिशवी उपलब्ध करून देण्याबाबत व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.

पालिकेच्या कारवाईत सातत्य आवश्यक
शहरातील सर्व अस्थापना, गोडाऊन दुकानदार यांनी प्लास्टिकवर बंदी असल्याने प्लास्टिकचा वापर टाळावा. आपल्या दुकानात अथवा गोडाऊनमध्ये प्लास्टिक पिशवी आढळल्यास नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पालिकेनेही सिंगल प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. यामुळे सिंगल प्लास्टिकचा वापर कमी होऊन पर्यावरणाचा समतोल ठेवता येणार आहे.

कारवाई सुरूच आहे
हातगाडे व व्यापाऱ्यांनी सिंगल प्लास्टिकचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर केल्याचे आढळल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. सूचना देवूनही वापर आढळल्यास कयदेशीर करावाई केली जाईल.
हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...