आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिव्यांग शिबिरामध्ये 333 जणांची तपासणी

उमरगा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपजिल्हा रुग्णालयात आयोजन, पात्र लाभार्थींना मिळेल ऑनलाइन प्रमाणपत्र

गतिमंद, दृष्टिदोष, जन्मजात अपंगत्व, स्वमग्न अशा मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १०) शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न झाले. यामध्ये ३३३ जणांची तपासणी करण्यात आली.

उमरगा तालुक्यातील दिव्यांगाची तपासणी, प्रमाणपत्र अन् आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग तपासणी शिबिरात गुरुवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम आळंगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनंदा सूर्यवंशी, डॉ. राजेश सोनवणे यांनी मोफत दिव्यांग तपासणी शिबिरात ३३३ जणांची तपासणी करण्यात आली. दिव्यांग तपासणी शिबिराला सहाय्यक गटविकास अधिकारी देवानंद वाघ, विस्ताराधिकारी एन. एस. राठोड, एच. व्ही. कोळी आदींनी भेट देऊन दिव्यांग व्यक्तीशी संवाद साधला. शहरासह तालुक्यातील दिव्यांगाची शंभर टक्के तपासणी करून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या भारत कांबळे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष राचय्या स्वामी, सुरज आबाचने, सचिन खाडेकर, महेश सोनवणे, नागराज मसरे, अजीम खजुरे, वासुदेव काशिद, धनराज माने, उमाकांत भोसले, शहरातील मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक बी. पी. वाघमारे, शिक्षकांनी सहकार्य केले.

तज्ज्ञांकडून अस्थिव्यंग, गतिमंद, अंधत्व व इतर तपासणी
शिबिरात अस्थिव्यंग १४६, मतिमंद ४५, अंधत्व ३२ व इतर ११० असे एकूण ३३३ दिव्यांची तपासणी करण्यात आली आहे. शिबिरातील पात्र दिव्यांग लाभार्थींना अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार असल्याचे डॉ. आळंगेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...