आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततचा पाऊस:अतिवृष्टीने बाधित पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

लोहारा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी (दि. ६) सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. तालुक्यातील बेंडकाळ, माकणी व सास्तूर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी तराळकर, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी चिंचोली काटे येथे वैशाली नितेश बिराजदार यांच्या शेतावर मनरेगा अंतर्गत सीताफळ लागवड व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड आणि गोविंद बिराजदार यांच्या शेतावर रुंद सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीची पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले की, येथून पुढे शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने शेती केली पाहिजे. सोयाबीनची पेरणी ही टोकन व रुंद सरीवरंबा पद्धतीने केल्यास त्याचा पिकांना लाभ होऊन उत्पादनात वाढ होत आहे. यामुळे यापुढे अशाच पद्धतीने पिकांची पेरणी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

बातम्या आणखी आहेत...