आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान:अतिवृष्टीग्रस्त नारंगवाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नारंगवाडी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नारंगवाडी विभागात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शिवारात शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.नुकसानग्रस्त पिकाचे व शेतीचे मंगळवारी (दि ०६) दुपारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकसानबाधीत शेतकरी बालाजी माळी, कालीदास कांबळे यांचा शेतात जाऊन पाहणी केली. दरम्यान गोगलगायीमुळे व सातत्याने होत असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून सर्वच शेतकऱ्यांना नक्की मदत मिळेल असे आश्वासित केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, कृर्षी उपसंचालक अभिमान्यु काशिद, तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर, नायब तहसीलदार शिवाजी कदम, मंडळ अधिकारी प्रवीण कोकणे,तालुका मंडळ कृषी अधिकारी दत्ता भालेराव, कृर्षी पर्यवेक्षक डी एम जाधव, पोलिसपाटील हेंमतराव पाटील, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी येत असलेल्या अडचणी सांगितल्या.

बातम्या आणखी आहेत...