आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची तपासणी‎:कडदोरा येथील जगदंबा नगर येथे‎ विद्यार्थी व नागरिकांची तपासणी‎

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कडदोरा‎ येथील जगदंबा नगर येथील शालेय‎ विद्यार्थी व नागरिकांची सोमवारी‎ (२)वॉटर शेड ऑर्गनायझेशन‎ ट्रस्टच्या मार्फत आरोग्य शिबीर‎ घेवून तपासणी करण्यात आली.‎ कडदोरा गावातील जगदंबानगर‎ भागातील महिला, विद्यार्थी व‎ नागरिकांची वॉटर शेड‎ ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या मार्फत‎ आरोग्य शिबिर घेण्यात आले.‎ शिबिरात गावात नागरिकांची व‎ विद्यार्थ्यांची बीपी व एच बी‎ तपासण्या करण्यात आल्या.‎

नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत‎ आरोग्य तपासणी करून घेतली.‎ वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट‎ ग्रामीण समुदाय समग्र विकास‎ कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील १६‎ गावामध्येशेती व पाणी, आरोग्य व‎ पोषण, शिक्षण कौशल्य‎ विकास,पायाभूत सुविधा आदी‎ विषयावर काम करत असून यासाठी‎ विभागप्रमुख अभिजीत‎ कवठेकर,तालुका समन्वयक समीर‎ सय्यद, तांत्रिक अधिकारी मंगेश‎ मांडगे यांच्या मार्गदर्शनात काम सुरू‎ असून शिबिरासाठी संस्थेच्या वतीने‎ आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.‎ आरोग्य शिबिरासाठी सरपंच सौ.‎ सुनंदाताई रणखांब, ग्रापं सदस्या‎ लक्ष्मीबाई रणखांब, मंगल बाई‎ पाटील उपस्थित होते. ‎

बातम्या आणखी आहेत...