आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयातून समाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, येडोळा, जकनी तांडा, गायरान तांड्यावर मागील ५ वर्षांपासून ग्रामसेवा कार्यक्रम चालू आहे. याअंतर्गत शाळा संगणकीकरण, जलशुद्धीकरण केंद्र, विद्युतीकरण, महिला सक्षमीकरण, उपजीविका विकास, स्वच्छता, बायोगॅस आदी विकास कामे झाली. याची पाहणी एसबीआय फाउंडेशनचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक अनिल काठेवाड यांनी करून समाधान व्यक्त केले.
तसेच यावेळी ‘दिलासा’चे सहायक प्रकल्प व्यवस्थापक अंतरयामी करजे, समन्वयक विलास राठोड, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड, गुरुदेव राठोड, भूषण पवार, श्रीमंत राठोड, अमित लोंढे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक इमामोद्दीन शेख, साहेबराव पवार, शिवाजी राठोड, प्रदीप कांबळे, भरत महाबोले, सहशिक्षिका प्रतिभा स्वामी, लक्ष्मी शिंदे, सुनिता गाडवे, अजित राठोड, सीताराम चव्हाण, मनोज चव्हाण, महिला बचत गटाच्या निर्मला राठोड, कांता राठोड हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.