आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणपती:कौडगावच्या विद्यार्थ्यांकडून मातीच्या गणेशाची स्थापना

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कौडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:हून तयार केलेल्या मातीच्या गणपतीची आपल्या घरात स्थापना केली आहे. यामध्ये त्यांनी विविध फळझाडांच्या बीयांचाही उपयोग केला असून यामुळे विसर्जन केलेल्या ठिकाणी वृक्षांची उगवण होणार आहे.

शाळेत पर्यावरणपूरक गणपती बनवण्यासाठी कार्यशाळेत शिक्षिका एस. डी. आटपळकर यांनी विद्यार्थ्यांना गणपती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मातीचे गणपती बनवले आहेत. यावेळी त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती न वापरण्याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी गणपती तयार करत असताना मातीमध्ये विविध फुल व फळझाडांच्या बियाणांचा उपयोग केला. यामुळे जेथे मूर्ती विसर्जित केली जाईल तेथे किंवा परिसरात विविध प्रकारचे झाडे तयार होणार आहेत. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मुख्याध्यापक देशमुख यांनी पर्यावरणाचे महत्त्वही सांगितले. तसेच पाण्याचे प्रदुषण टाळण्यासाठी कानमंत्रही दिला. यावेळी १०० अधिक विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवून घरात स्थापित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...