आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायाची स्थापना:पुस्तक वाचत असलेल्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना ; वाचनालयाला पुस्तके भेट द्यावीत हा उपक्रमाचा हेतू

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे. या पुस्तक वाचणाऱ्या श्री मूर्तीला केवळ पुस्तके द्यावीत हा उद्देश या मागे आहे.वाचनालयातील गणेश मूर्तीची पूजा, नेवैद्य असे काहीही मागत नसून केवळ पुस्तके द्यावीत असा संदेश देण्यासाठी ही युक्ती आहे. संकलित झालेली ही पुस्तके वाचनालयातील वाचकांना वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची ॲड. शीतल चव्हाण यांनी केलेली आहे. प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयातर्फे उमरगा-लोहारा तालुक्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. उपक्रमात व्यंकट भालेराव, सत्यनारायण जाधव, करीम शेख, प्रदिप चौधरी, धानय्या स्वामी, शांताबाई चव्हाण, राजू बटगिरे, अनुराधा पाटील, बबिता मदने, संतोष चव्हाण आदी सामील आहेत.

बातम्या आणखी आहेत...