आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित:खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान, संबंधितांना निलंबित करा ; संघटनेचे एसडीओंना निवेदन

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अवमानप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांना निलंबित करावी, अशी मागणी व्ही. एस. पँथर्स संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार सतत येत असतात. यावेळी राजकीय मंडळी नेहमीच मंदिरातील मुख्य गर्भगृहात जातात. तेव्हा शासन नियम व वेळेचे पालन केले जाते का? मंदिराच्या व्यवस्थापक तहसीलदारांनी देऊळ कवायत कलम ३६ चा संदर्भ देत खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मुख्य गर्भगृहात जाण्यापासून रोखणारे मंदिर संस्थानचे सहजनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांचे समर्थन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते.

त्यामुळे मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार व सहजनसंपर्क अधिकाऱ्यांना निलंबित करावे. निवेदनावर संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड, कळंब शहराध्यक्ष मोजम खान, प्रशांत गायकवाड, अजय कांबळे, राहुल मुळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...