आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:राज्यपालांविरोधात तीव्र संताप, ‘कोश्यारी, गो बॅक, कोश्यारी हटाओ, भगाओ’चा नारा

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“गो बॅक कोश्यारी, कोश्यारी हटाव, कोश्यारी भगाव’, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप वगळता विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी (दि.२१) माेर्चा काढण्यात आला. सायंकाळी मोर्चा काढूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. संविधानीक पदावरील कोश्यारी वारंवार वादग्रस्त विधाने करून महापुरुषांची बदनामी करत असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सार्वजनिक कार्यक्रमात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. भाजपचे राज्यसभा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांच्याविरोधात उस्मानाबादेत मोर्चा काढून निषेध करण्यात आला. येथील महात्मा ज्योतीबा फुले चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा नेण्यात आला. यावेळी कोश्यारी हटाव, कोश्यारी भगाव, कोश्यारी गो बॅक अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

उस्मनाबादेत ठाकरे सेनेचे जोडे मारो आंदोलन राज्यपाल कोश्यारी, भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्या पुतळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोडे मारो आंदोलन केले. उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. संजय मुंडे, आतिष पाटील, सोमनाथ गुरव, संपदाताई धोंगडे, बाळासाहेब काकडे, प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, बंडू आदरकर, सुरेश गवळी, नाना घाडगे उपस्थित होते.

कळंब : प्रतिमेवर शाई फेकत जोडे मारो आंदोलन कळंब येथे महाविकास आघाडीच्या वतीने कोश्यारी यांच्या फोटोवर शाई टाकून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, शेकापचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष संजय कांबळे, शहराध्यक्ष मुसद्देक काझी, काँगेस तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, अॅड. दिलीपसिंह देशमुख, भागवत धस, विलास करंजकर उपस्थित होते.

राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्यं { १४ फेब्रुवारी: पुणे येथे ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या वैवाहिक जीवनावर असभ्य भाष्य करून टिंगल केली. { २७ फेब्रुवारी: औरंगाबाद येथे ‘समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार’? असे वक्तव्य केले. { २९ जुलै: मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई-ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे वक्तव्य. { २० नोव्हेंबर: पुन्हा एकदा त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करून महाराजांचा अवमान केला आहे.

बातम्या आणखी आहेत...