आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड प्रदान:अनमोल थोरबोले यांना इंटरनॅशनल फेलोशिप अवॉर्ड

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील अनमोल हनुमंत थोरबोले यांना अमेरिकेत इंटरनॅशनल फेलोशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला. अमेरिकन असोसिएशन फॉर रेस्पिरेटरी केअर संस्थेकडून हा अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला असून,६८ वर्षात हा पुरस्कार मिळविणारी अनमोल पहिली भारतीय असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पुरस्काराबद्दल अनमोल यांचे अभिनंदन होत आहे.

अमेरिकन असोसिएशन फॉर रेस्पिरेटरी केअर संस्थेचा ६८ वा समारंभ नुकताच पार पडला. यावेळी अनमोल थोरबोले यांना रेस्पिरेटरी केअर प्रोग्राममधील इंटरनॅशनल फेलोशिप पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.६८ वर्षात या अमेरिकेन संस्थेचा पुरस्कार मिळवणारी अनमोल ही पहिली भारतीय असल्याचे तिचे वडिल हनुमंत थोरबोले यांनी सांगितले.अनमोल सध्या बंगलोर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये रेस्पिरेटरी केअर विभागाच्या रिजनल प्रमुख आहेत. कोरोना काळात दोन वर्षे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे कार्य केले.

या काळात तीनवेळा कोरोना संसर्ग होऊनही त्यांनी रूग्णांसाठी योगदान दिले. रेस्पिरेटरी विषयावर काम करणारी सर्वात मोठी अमेरिकन संस्था असून, या संस्थेकडून रेस्पिरेटरी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अमेरिकेबाहेरील केवळ दोन व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो.या पुरस्कारासाठी अनमोल यांची निवड झाली. अनमोल थोरबोले यांचे शिक्षण अहमदाबाद व पुणे येथे झाले.

बातम्या आणखी आहेत...