आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:नवोदय विद्यालयात‎ जागतिक महिला दिन‎

तुळजापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎जवाहर नवोदय विद्यालयात‎ जागतिक महिला दिना निमित्त‎ घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत‎ तनिष्का मगर, मानसी मुरकुटे यांनी‎ प्रथम क्रमांक पटकावला आहे.‎ यावेळी विद्यालयातील सर्व‎ अध्यापिकांचा शाल, गुलाब पुष्प व‎ टिफिन देऊन सत्कार करण्यात‎ आला.‎ प्रारंभी मानसी मुरकुटे या‎ विद्यार्थिनीने जागतिक महिला‎ दिनाचे महत्व सांगितले.

कथाकथन‎ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले‎ होते. या स्पर्धा मुलींच्या वरिष्ठ व‎ कनिष्ठ गटामध्ये आयोजित‎ करण्यात आल्या होत्या. महिला‎ दिना निमित्त विद्यालयातील सर्व‎ अध्यापिकांचा शाल, गुलाब पुष्प व‎ टिफिन देऊन सत्कार करण्यात‎ आला. तसेच विद्यालयातील सदन‎ नायिकांचाही यावेळी गुलाब पुष्प व‎ पेन देऊन सत्कार करण्यात आला.‎

यावेळी शेवटी विद्यालयाचे प्राचार्य‎ गंगाराम सिंह यांनी पौराणिक‎ काळातील दाखले देत महिलांचे‎ जीवनातील महत्व विशद केले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. जी.‎ जाधव यांनी केले.‎ कथाकथन स्पर्धेचा निकाल‎ याप्रमाणे. कनिष्ठ गट प्रथम क्रमांक‎ - तनिष्का मगर, द्वितीय क्रमांक -‎ वेदिका गादेकर, तृतीय क्रमांक -‎ भक्ती भोसले तर वरिष्ठ गटात प्रथम‎ क्रमांक - मानसी मुरकुटे, द्वितीय‎ क्रमांक - अनुराधा भगत,तृतीय‎ क्रमांक - अमरजा ढेपे‎ दरम्यान शहर आणि जिल्हयामध्ये‎ विविध शाळा तसेच‎ महाविद्यालयांमध्ये जागतिक‎ महिला दिनानिमित्त विविध‎ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात‎ आले.‎ ‎

बातम्या आणखी आहेत...