आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासनातनी वृत्तीच्या राजकर्त्यांकडून संविधानाची खिल्ली उडवली जात असून लोकशाही आणि संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच रोखण्यासाठी संविधानाचा जागर घालण्याचा स्तुत्य उपक्रम प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्था करत असल्याचे प्रतिपादन सहायक धर्मदाय आयुक्त एस.पी.पाईकराव यांनी संविधान सप्ताहच्या समारोप प्रसंगी केले.
दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने संविधान सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहादरम्यान भैरवनाथ अध्यापक विद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची संविधान ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती.
दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरातील विरुंगुळा येथे संविधान सप्ताह समारंभ अॅड. त्र्यंबक मनगिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी एकशे तीस विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. त्यापैकी मुक्ताई गुणवंत देशमुख प्रथम,वेदिका दीपकराव कुलकर्णी द्वितीय, प्रीती विक्रम पांचाळ तृतीय या विद्यार्थ्यांनी यात यश मिळविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून विरंगुळा केंद्रात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान सप्ताह समारोप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.त्र्यंबक मनगिरे यांनी संविधानामुळे सर्व भारतीयांचे हक्क,अधिकार सुरक्षित असल्याने संविधाना प्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी अॅड.पी.डी.देशमुख, प्रशिक्षणार्थी तहसीलदार काकडे,काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार,माजी नगरसेवक सुनील गायकवाड, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक एस.डी.अग्रीहोत्री,निरीक्षक एस.एच.क्षिरसागर, लिपिक एस.के.राजगुरू,लेखापाल बाळासाहेब गंगावणे,सेवक यु.एस.शिंदे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानातील प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविक प्रबुद्ध रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.