आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात एकुरगा येथे श्री शिवशक्ती विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब व सामाजिक वनीकरण विभाग योजनेअंतर्गत "प्रसार प्रसिद्धी" कार्यक्रम सोमवारी (६) आयोजित करण्यात आला. ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक काका मगर,वनसेवक व्यंकट पाटील, ऑपरेटर विष्णू कांबळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या सद्यस्थिती बाबत विविध उपक्रमाद्वारे अद्यावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामांमध्ये सहभागी करून घेणे, त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
पर्यावरणाच्या प्रश्नाची जाण असलेली संवेदनशील नवीन पिढी तयार करण्याचे महत्त्वाचे काम या योजनेतून केले जाईल या विषयी माहिती देण्यात आली.विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण कार्यालय उमरगा हरित सेना अंतर्गत प्रचार प्रसिद्धी अंतर्गत प्रजोक्टर व्हिडिओच्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास कसा होत आहे याची माहिती देण्यात आली. तसेच टाकाऊ पाणी बाटली पासून रोप कसे तयार करायचे, टाकाऊ बांबूपासून रोपांना ट्रीगार्ड बनवणे, पालापाचोळा गोळा करून गांडूळ खत तयार करणे, तसेच एक झाड एक विद्यार्थी संकल्पना शाळेत राबविण्यात यावी ही माहिती व्हिडिओ माध्यमातून देण्यात आली. कार्यक्रमासाठी हरित सेना शिक्षक सोमनाथ म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.यावेळी अध्यक्ष श्री बोंडगे म्हणाले की, वृक्ष हेच आपले खरे मित्र आहेत.
यासाठी या झाडांचे आपण संगोपन करावे. आपल्या जीवनाच्या प्रारंभापासून ते अखेरपर्यंत झाडामुळेच प्राणवायू मिळतो. पर्यावरणाचा कायम समतोल ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी झाडाचे संगोपन करावे,असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक धनराज पाटील, राजेंद्र सगर, विजया गायकवाड, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके, माळाप्पा कोकरे, दत्तू कांबळे, मोहन दुधंबे, शिवाजी चेंडके यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
एकुरगा शिवशक्ती विद्यालयात पर्यावरण प्रसार व प्रसिध्दी
इंटरनेट आणि मोबाइलच्या प्रसारामुळे अपारंपारिक उर्जा स्त्राेतासह पर्यावरण, जंगल तसेच वन्यप्राणी व पशुपक्षी यांच्यासंदर्भातही शालेय विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता रूजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सामाजिक संस्थांचाही उत्साही सहभाग असून याला वाढता प्रतिसाद आहे.
मोठया प्रमाणावर वृक्षारोपण होत असले तरी त्यात विदेशी झाडांचा प्रसार भारतीय पर्यावरणात योग्य ठरत नाही. अशा विदेशी रोपांचा काही उपयोग नसतो. त्याऐवजी फळे येणाऱ्या झाडांचे रोपण केले तर जंगलांमधील प्राणी शहरात वावरण्याचे प्रमाण कमी होईल. सोमवारी पुणे परिसरात एक बिबटया रस्त्यावर हिंडताना दिसला यामुळे नागरिक भयभीत झाले. असे प्रकार पुन्हा दिसू नये यासाठी पर्यावरण सुधारणे गरजेचे आहे. केवळ दिसायला चांगली म्हणून निरर्थक रोपे लावण्यापेक्षा ऑक्सिजन देणारी झाडे लावणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.