आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​आराेग्यमंत्र्यांचा इशारा:कामात कुचराई केल्यास खैर नाही, जनतेची कामे 8 दिवसांत पूर्ण करा

वाशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यासह शहरातील विविध समस्या सोडवून जनतेच्या सुखसुविधेची सार्वजनिक व वैयक्तिक सर्व कामे संबंधित अधिकाऱ्यांनी आठ दिवसात मार्गी लावावीत. मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी १७ सप्टेंबरला घेण्यात येणाऱ्या जनता दरबारात याबाबत आढावा घेवून विचारना केली जाईल. कामात कुचराई केली तर संबंधीत अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी मंगळवारी (दि.६) परंडा, भूम व वाशी तालुक्यांच्या आढावा बैठकीत दिला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी, विविध बँकेचे अधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

परंडा येथील बैठकीत प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, शहर व तालुक्यातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवावे. तहसीलदारांनी मुरूम उपलब्ध करुन द्यावा. नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेसह रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. मुतारीची सुविधा करत पथदिवे बसवावेत. महावितरणने सुरळीत अखंडीत वीजपुरवठा सुरू ठेवावा. राज्य परिवहन परंडा बस आगाराने चांगली बससेवा द्यावी. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पीक व शेतीच्या नोंदी घ्याव्यात. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा. आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा चोख बजवावी. परंडा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व यंत्रना व बंद पडलेल्या मशिन चालु कराव्यात, सफाई कामगार भरतीसाठी स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे. स्वच्छता तसेच इतर किरकोळ कामासाठी जमा झालेल्या शुल्कचा वापर करावा. सर्व कामे आठ दिवसात पूर्ण करावीत आगामी जनता दरबार व आढावा बैठकीत याबाबत काम पूर्ण केल्याचा अहवाल द्यावा. अन्यथा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही सावंत म्हणाले.

आता जिल्ह्यातच ठाण वाशी येथील आढावा बैठकीतही सावंत यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याची तंबी दिली. यावेळी सांवत म्हणाले की, मी आता जिल्ह्यातच कायम ठाण मांडून बसणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन कसे तत्पर राहिल यावर बारिक लक्ष ठेवणार आहे. यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने कामचुकारपणा करू नये. कामावर लक्ष द्यावे.

विद्यार्थ्यांमध्ये रमले डाॅ. सावंत
भूमच्या श्री गुरूदेव दत्त हायस्कुलचे विद्यार्थी बाहेर पडले होते. तेव्हा आढावा बैठकीकडे जाता सर्व विद्यार्थ्यांनी सावंत यांना हाथ दाखवला. तेव्हा लगेच सावंत यांनी आपला ताफा थांबवला. कारच्या खाली उतरून त्यांनी विद्यार्थ्यांच्या घोळक्यात प्रवेश केला. तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुढच्या वेळी तुमच्या शाळेत येईन, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातात हात देत फोटोसेशनही केले. यावेळी विद्यार्थ्यांचा जल्लोष वाढला होता.

पालिकेच्या सर्व जागा जिंका भूममध्येच डॉ. सावंत यांच्या हस्ते अलमप्रभू उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे डॉ. सावंत यांच्यासोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना गाढवे यांना उद्देशून सावंत म्हणाले की, आगामी निवडणुकीत सर्वजागा निवडूण आणा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, तुम्हाला निधी कमी पडून देणार नाही. अडिच वर्षात जेवढे कामे झाली नाहीत त्याचा बॅकलॉग पुढे भरून काढणार आहे. जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...