आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करुन त्यांची जोपासना करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी केले. तालुक्यातील हाडोंग्री येथील धाराशिव ध्यान केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बाळासाहेब पाटील-हाडोंग्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य पाटील व अनुष्का पाटील यांच्या संकल्पनेतून रोपवाटप व वार्षिक वृक्षसंवर्धन बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. तसेच पर्यावरण संवर्धन केंद्राची स्थापनाही झाली. याप्रसंगी गटविकास अधिकारी तथा प्रशासक बी. आर. ढवळशंख व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तानाजी चव्हाण उपस्थित होते. रोहिणी नऱ्हे पुणे जिल्ह्यातील माळीण येथे घडलेल्या दुर्घटनेची आठवण करून देत म्हणाल्या की, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याप्रसंगी वृक्षलागवड करुन ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले. वृक्षसंवर्धन करणाऱ्या व्यक्तींनी ५०० रुपयांचे रोख बक्षीस देण्याचे बाळासाहेब पाटील यांनी घोषीत केले होते. मागील वर्षी रोपांचे संवर्धन करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन जमिनीचे वाळवंटीकरण, पर्यावरण संवर्धन व सेंद्रीय शेतीविषयी आदित्य पाटील, अनुष्का पाटील व बारामतीचे पर्यावरणप्रेमी जाधव यांनी सविस्तर व उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमास संजीवनी पाटील, अमेय पाटील, ओंकार पाटील, परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या सव्वा लाख वृक्षलागवड संकल्पाचे कौतुक करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.