आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक लाख नागरिकांना अन्नदान करणे पुण्य; पण घरातील व्यक्ती जर उपासी झोपत असेल तर ते महापाप आहे. संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजोत्सव, पूर्वसंध्येला तुरोरी येथील कीर्तन सेवेत जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचि दैवाचा पुतळा, आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा, अभंगावर किर्तन सेवेत हभप हरी गुरुजी लवटे महाराज बोलत होते. गुरूवारी दुपारी तुकाराम बीजेदिवशी पंढरपूरचे हभप ज्ञानेश्वर महाराज चातुर्मासे यांचे गुलालाचे कीर्तन झाले. पुढे बोलताना हभप लवटे महाराज म्हणाले की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तोच मला मनापासून आवडतो.
भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे नमन ती भक्ती देवाला,संताला आवडते. रात्रं दिवस माझे जे भजन करतात, मनन चिंतन करतात, ध्यान करतात त्यांना भक्ती म्हणा. हुंडाबंदी, व्यसन मोबाईलचा अती वापर,आई-वडील संगोपण,श्रमप्रतिष्ठा या बाबीवर त्यांनी सुंदर चिंतन मांडले. किर्तन सेवेनंतर दहा हजाराहून अधिक भाविकांनी बीजोत्सवात महाप्रसादाचा लाभ घेतले. यावेळी सरपंच मयूरी नितीन जाधव, उपसरपंच तुकाराम जाधव, शिवसेना शाखा प्रमुख विजयकुमार भोसले, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, ग्रापं सदस्य अशोक जाधव, सुनील राठोड, प्रभाकर जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पवन जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, माधव जाधव, पंडित शिंदे, विजयकुमार शिंदे, तुकाराम मंमाळे, व्यापारी महासंघ अध्यक्ष अभिजीत जाधव, सचिव बालाजी माणिकवार, उपाध्यक्ष बालाजी जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.
आष्टा जहागीर येथे महंत अवधुतपुरी महाराज यांचे कीर्तन
आष्टा जहागीर येथेजगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. संतयोगी दामोदर मठ संस्थांचे मठाधिपती श्री श्री श्री १००८ महंत अवधूतपूरी महाराज यांचेबीज उत्सवानिमित्त कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.
महंत अवधूतपूरी महाराज कीर्तनात म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती प्रबळ होती.४२ वर्ष तुकोबांरायांनी परमार्थ चालविला. तुकोबांरायांच्या काळात प्रस्थापितांनी तुकोबांची गाथा नदीपात्रात बुडविली. परंतुतो गथा बुडली नाही. भक्तासाठी भगवंतांनी गाथा बुडू दिली नाही. रामेश्वर भट्ट तुकोबारायांचे कट्टेर विरोधक होते. त्यांनी जीवनभर त्रासदिला. प्रत्येक घरा घरात तुकोबांचा गाथा वाचली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.