आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकबधीर शाळेत पाण्याची व्यवस्था:जगदंबा ट्रस्टकडून स्वआधारच्या विद्यार्थिनींना गणवेश वाटप

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिलवडी येथील रहिवाशी व पुण्यातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. रत्नदीप जाधव यांच्या जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वआधार गतिमंद निवासी प्रकल्पातील मुलींना हायजेनिक किट आणि गणवेश वाटप करण्यात आला.यावेळी जगदंबा ट्रस्टच्या वतीने सदरील निवासी प्रकल्पातील १११ विद्यार्थिनींना गणवेश देण्यात आले. दिवाळीत ट्रस्टच्या वतीने हायजेनिक किट (ब्रश, पेस्ट,साबण, कंगवा, शांपू, तेल बॉटल) आदींचे वाटप करण्यात आले. जगदंब ट्रस्टच्या वतीने यापूर्वी कोविड काळात उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात ७० ऑक्सिजन कॉन्स्टेटर्स, २० व्हील चेअर, १२ स्ट्रेचर, २२०० जीवरक्षक इंजेक्शन आदींची मदत करण्यात आली होती.

तसेच चिंचवड येथील मुकबधीर शाळेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सचिव एस. एन. चव्हाण, ट्रस्टचे उपाध्यक्ष बाजीराव जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रत्नदीप जाधव, अॅड. मकरंद कठारे, ट्रस्टच्या सदस्य विना पाटील, अमोल यादव, सूरज जाधव, अजय जाधव, संजय आडगळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...