आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी चमकदार कामगीरी:दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत जगताप कर्णबधिर विद्यालयाने यश

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगीरी केली असून एक सुवर्ण व ३ राैप्य पदक पटकावत जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.समाज कल्याण विभागाच्या वतीने उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियमवर दिव्यांगाच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालयातील आदित्य पवार याने ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक व लांब उडीमध्ये रौप्य पदक पटकावले. तर स्नेहल गायकवाड या विद्यार्थ्यांनीने लांब उडी व ५० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले. रावसाहेब जगताप विद्यालयाने मूकबधिर शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

बातम्या आणखी आहेत...