आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती विविध कार्यक्रम:शाळेत जय जवान जय किसान घोषणा‎ ; मुलांना सविस्तर मार्गदर्शन

काक्रंबा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा ‎ ‎ परिषद शाळेत रविवार दि २ रोजी‎ राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर ‎शास्त्री जयंती विविध कार्यक्रमाने मोठ्या ‎उत्साहात साजरी करण्यात आली.‎ सकाळी साडे आठ वा माजी‎ मुख्याध्यापक वामन पांडागळे,‎ उस्मानाबाद ग्रामीण बीटचे विस्तार ‎अधिकारी अशोक स्वामी यांच्या हस्ते‎ प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या‎ मुख्याध्यापिका उषा उंबरे उपस्थित होत्या‎ प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमा नंतर‎ विद्यार्थ्यांची भाषणे झाली उपक्रमशील‎ सहशिक्षिका संजीवनी सरवदे यांनी‎ राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर‎ शास्त्री यांच्या विषयी गोष्टीच्या रूपात‎ मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर‎ शाळेतील शिक्षिकांनी रघुपति राघव‎ राजाराम भजन गायले. वामन पांडागळे‎ यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चातून‎ बक्षिसे व खाऊ वाटप करण्यात आला‎ यावेळी शाळेतील शिक्षक वृंद माया‎ पवार ,वर्षा पाठक, जयश्री चव्हाण‎ ,दिपाली परदेशी,संजीवनी सरवदे‎ अश्विनी जोगदंड , जगन्नाथ वाघे ,छगन‎ जगदाळे ,अनिल दहीहांडे उपस्थित होते.‎ सूत्रसंचालन उमेश सुर्वे यांनी व आभार‎ प्रदर्शन अनिल दहीहांडे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...