आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“सब समाज को साथ लिये है” हे सुत्र गौरवशाली भारताच्या उज्ज्वलतेचे मंगलगान असून यासाठी विषमता दूर सारून बंधुत्व व स्नेहाने समाज एक होणे गरजेचे आहे. त्यासाठी छत्रपतींच्या संकल्पनेतून उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे एक गाव-एक स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे.
जकेकुरवाडी गावात कोणत्याही समाजाची स्मशानभूमी नव्हती. प्रत्येकाला आपल्या शेतात किंवा रोडच्या कडेला अंत्यविधी करावे लागत होते. सरपंच अमर सूर्यवंशी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून स्मशानभूमी, सिमेंट रस्ता मंजूर करुन घेतला. या कामाचा शुभारंभ नववर्षदिनी रविवारी (दि. १) सरपंच व ग्रामस्थांच्या हस्ते झाला. गावात स्मशानभूमी होत असली तरी, स्मशानभूमी कोणत्या समाजाची, असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने सूर्यवंशी यांनी ही स्मशानभूमी गावातील सर्व समाज, उर्वरित पान ४
२० लाख रुपयांत साकारतेय स्मशानभूमी स्मशानभूमी होण्यासाठी तसेच निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू होता. आता त्यासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले. दहा लाख रुपयांत स्मशानभूमीचा रस्ता आणि दहा लाख रुपयांत स्मशानभूमीचे काम करण्यात येणार असून गावकऱ्यांना भर पावसातही अंत्यसंस्कार करता येईल.
छत्रपतींचा आदर्श समोर ठेऊन काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेनुसार अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन चालण्याचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ‘एक गाव एक स्मशानभूमी’ संकल्पना गावात राबवत आहे. ही स्मशानभूमी गावातील सर्व जाती आणि धर्माच्या लोकांसाठी असणार आहे. अमर सूर्यवंशी, सरपंच, जकेकूरवाडी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.