आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात जकेकुरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने सहशालेय उपक्रमामधून विद्यार्थ्यानी क्षेत्र भेटीतून धार्मिक व सांस्कृतिक माहिती श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान व ग्रामदैवत महादेव मंदिरास क्षेत्र भेटी घेवून जाणून घेतली. उमरगा शहराचे ग्रामदैवत असलेले महादेव मंदिर हे प्राचीन काळातील हेमाडपंती मंदीर असून या मंदिरात हेमाडपंती बांधकामासह मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रम्हा, विष्णु व महेश तिनही देवतांच्या मूर्ती आहेत.
शहरासह सीमावर्ती भागात देवस्थान असल्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान ग्रामदैवत महादेव मंदिर ठरले आहे. धार्मिक उत्सवा निमित्त वर्षभरात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होतात.मंदिराचे सर्व बांधकाम प्राचीन असल्याने विद्यार्थ्यांनी काळ्या दगडावर कोरलेल्या शिल्पाची पाहणी करत माहिती जाणून घेतली. अचलबेट देवस्थान हे तालुक्यातील तुरोरी व कराळी परिसरात निर्सगरम्य ठिकाणी डोंगर माथ्यावर भव्य व सीमावर्ती भागातील गावातील भक्ती प्रचाराचं केंद्र म्हणून सर्वश्रुत आहे. सन १९७१ पूर्वी हे उजाड माळरान होते. डोंगररांगेत आठशे वर्षा पुर्वीच्या गुहा आहेत.
यामध्ये साधारणतः साठ वर्षापूर्वी नाथपंथी सदगुरु प. पु. काशिनाथ महाराज यांनी प्रस्थान केले.गुहेला तपोभूमी म्हणून ओळख असून येथे पवित्रधुनी, गुरुगादी आजतागायत सुरू असून गुहेत एकाच वेळी जवळपास पाचशे व्यक्ती बसतील अशी विस्तृत जागा आहे. गुहेत बाहेरच्या वातावरणापेक्षा आतील तापमान वेगळे असून कोणत्याही वातावरणात वायूची सोय निसर्ग निर्मित आहे. जागृत धुनी, तेजाची तेजोमय पूजा ही वैशिष्ट्ये आहेत. विस्तीर्ण माळरानावर हिरवेगार झाडे, विविध देव देवतांची मंदीरे, मोकळ्या मैदानात फरशी, कट्टे, उजवीकडे पाच मंदिर, भव्य सभामंडप, समाधी मंदिर असे विलोभनीय स्थळांची पाहणी विद्यार्थ्यांनी केली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रमोद मोरे यांनी क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांना दोन ठिकाणची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पाहणी करत माहितीच्या आधारे नोंद टिप्पणी करून संकलित करण्यात आले. यासाठी मुख्याध्यापक बालाजी दुधनाळे, सहशिक्षक रघुवीर आरणे, मल्लिकार्जुन कोळी, प्रमोद साखरे, अमिता वाघवसे आदींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.