आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजकेकुर जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि ४) साजरे झाले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुमनताई काळे या होत्या. सरपंच अनिल बिराजदार, उपसरपंच हरिभाऊ बिराजदार, ग्रापं सदस्य अजिंक्य पाटील, दत्तात्रय डोंगरे, शालेय समिती उपाध्यक्षा शारदा चौधरी, जकेकुर ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मुख्याध्यापक व्यंकट घोडके, केंद्रप्रमुख नंदकुमार चौधरी, मुख्याध्यापक संजय चालुक्य आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून उदघाटन झाले.वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेशभूषेबरोबरच, अभंग,सांप्रदायिक फुगडी, देशभक्तीपर गीत, यामध्ये आय लव्ह माय इंडिया, घे पाऊल पुढे जरा, जहां डाल डाल पर,ऐसा देश है मेरा,निसर्ग गीत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण, पारंपारिक, रिमझिम गीत, राधे राधे गीत, आई जगदंबे आधारित जोगवा, ललाटी भंडार,रिमिक्स गाणे आदि गाणी सादर केली. वैयक्तिक, युगल, सामूहिक नृत्यही सादर केले.
या बरोबर विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक विषयावर एकांकिका सादर केल्या. यामध्ये प्लास्टिक टाळा-पर्यावरण वाचवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, काव्य प्रतिभा(कवितेची ओळख),सोना और लोहा या नाटिका सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय चालुक्य, अनुराधा मोहिते, मोहन सालेगावकर, परमेश्वर साखरे, गंगू लोखंडे, कविता देशमुख, विद्या कांबळे, चैनसबी अत्तार, सुधाकर चव्हाण, तुळशीदास पांचाळ, उद्धव सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक चालुक्य यांनी प्रास्ताविक केले. सालेगावकर, लोखंडे, देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. परमेश्वर साखरे यांनी आभार मानले. विविध शाळांमध्ये स्नेहसंमेलने चालू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.