आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:जल जीवन योजना त्वरित कार्यान्वित करण्यात यावी; कलदेव निंबाळा येथे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी उपोषणाचा इशारा

उमरगा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कलदेव निंबाळा गावाला उन्हाळ्यात दरवर्षी अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो ही खेदजनक बाब असल्याचे खंत सरपंचासह महिलांत निर्माण झाली असल्याने जल जीवन योजना त्वरित कार्यान्वित करण्यात यावी यासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कलदेव निंबाळा गावात गेल्या २५ वर्षापासून पाण्याचा प्रश्न असून यंदाच्या वर्षीही दहा एप्रिल पासून अधिग्रहणाचे द्वारे तहान भागवली जात आहे. अधिग्रहणाचे पाणी सार्वजनिक ठिकाणी आणून सोडण्यात आले आहे.येथूनच जेष्ठ,दिव्यांग महिला, मुले आणि नागरिक दोन महिन्यांपासून डोक्यावर, सायकलीने पाणी घेवून जात आहेत.नळ योजना नसल्याने वर्षभर ही येथून पाणी नेले जाते. पाण्यासाठी ग्रामपंचायतने दिलेला अधिग्रहण प्रस्ताव अद्यापही शासन दरबारी मंजूर करण्यात आलेला नाही.

गावास कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन लवकर राबविण्यासाठी सरपंच सुनिता पावशेरे यांनी पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला असतानाही ही योजना लाल फितीत अडकून पडली आहे. गावाजवळ असलेल्या काळानिंबाळा तलावातून योजना राबवण्यासाठी सर्वेक्षण करुन अंदाजपत्रक तयार करण्यात आले.त्यांनर ते विविध कारणाने थांबवण्यातही आले. ग्रामसभेच्या ठराव घेवून ही योजना होण्यास पुन्हां मागणी ही करण्यात आली आहे.

या योजनेसाठी पाणीपुरवठा उपअभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अन पाणीपुरवठा राज्यमंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून, बैठकीत निवेदन प्रस्तावासह अनेक वेळा मागणी केली. जल जीवन पाणीपुरवठा योजना प्राधान्याने राबविण्यात यावी अशी शिफारस पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही जिल्हा परिषदेकडे यापूर्वीच दोन वेळा केली आहे. लवकर पाणीपुरवठा योजना मंजूर करुन राबविण्यात येईल असे आश्वासन अन लेखी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आले. दीड महिना होऊन गेले तरी अद्याप योजना जैसे थे आहे.

बातम्या आणखी आहेत...