आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:पर्युषण पर्वानिमित्त जलकुंभ मिरवणुकीचे आयोजन

तुळजापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्युषण पर्वानिमित्त शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरच्या वतीने शहरातून जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. लोहीया मंगल कार्यालयात मिरवणूकी ची सांगता झाली. याावेळी जैन समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील आर्य चौकातील जैन मंदिरातून जल कुंभ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी इंद्र - इंद्रायणीचा मान श्रद्धा शेटे व पलाश शेटे यांना मिळाला. भवानी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे लोहिया मंगल कार्यालयात मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. पर्युषण पर्वा निमित्त उपवास केलेल्या महिलांचा जैन महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मिरवणुकीत कल्पना सोलापुरे, श्रद्धा शेटे, ऐश्वर्या व्यवहारे, अंकिता सोलापूर, पौर्णिमा किवडे, प्रणिता राव, गौरी शेटे, श्रावणी शेटे, माही शेटे, संस्कृती राव, समीक्षा मैंदर्गे, नम्रता डोळ, नंदिनी डोळ, आयुषी व्यवहारे, श्रेयांशी रोकडे आदींनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी मनीषा व्यवहारे, वैशाली व्यवहारे, पद्मजा वराडे, सुनंदा रोकडे, रेखा काटकर, जयश्री कंदले, ज्योती मेहता यांच्यासह परिसरातील महिलांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...